खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकारकडून ₹१५ हजारांचे प्रोत्साहन भेटणार

पंतप्रधान मोदींची ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ जाहीर; नियोक्त्यांनाही मिळणार लाभ

PM-VBRY Scheme Details 2025
PM-VBRY Scheme Details 2025 



स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांसाठी मोठी घोषणा केली. ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत, पहिली नोकरी लागल्यानंतर पात्र उमेदवारांना थेट ₹१५,००० प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे.


"तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि सुरुवातीलाच आर्थिक बळ मिळावे, यासाठी ही योजना राबवली जाईल," – पंतप्रधान मोदी


कोण पात्र ?

  • वय १८ ते ३५ वर्षे
  • खासगी क्षेत्रात पहिलीच नोकरी
  • EPFO मध्ये पहिल्यांदा नोंदणी
  • मासिक पगार ₹१ लाखांपर्यंत


रक्कम कशी मिळेल ?

प्रोत्साहन रक्कम दोन टप्प्यांत मिळेल –

  1. पहिला हप्ता: ६ महिन्यांच्या सेवेनंतर
  2. दुसरा हप्ता: १२ महिने पूर्ण झाल्यावर आणि वित्तीय साक्षरता प्रशिक्षणानंतर


नियोक्त्यांसाठीही प्रोत्साहन

नवीन भरती केलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नियोक्त्यांना दरमहा ₹३,००० प्रोत्साहन दिले जाणार आहे. उत्पादन क्षेत्रात हा लाभ चार वर्षांसाठी तर इतर क्षेत्रात दोन वर्षांसाठी राहील.


हे वाचा 👇👇

Crop Insurance Update 2025 : आज शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची भरपाई


योजनेचा कालावधी व उद्दिष्ट


लागू कालावधी :- १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७


शासनाचे उद्दिष्ट :- २ वर्षांत ३.५ कोटी रोजगारनिर्मिती


यामध्ये १.९२ कोटी लाभार्थी हे प्रथमच नोकरी करणारे असतील


महत्वाची अट

लाभ मिळवण्यासाठी नियोक्त्यांनी EPFO च्या ECR (Electronic Challan cum Return) मध्ये अचूक माहिती भरली पाहिजे; अन्यथा लाभ मिळणार नाही.


यासाठी अर्ज करण्यासाठी सरकारकडून लवकरच अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत संकेतस्थळाची माहिती जाहीर केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post