Ladaki Bahin Yojana Update 2025 : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. सुमारे २६ लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या महिलांना मिळणारे दरमहा १,५०० रुपये जून २०२५ पासून थांबवण्यात आले आहेत.
![]() |
| Ladaki Bahin Yojana Update 2025 |
आयटी तपासात उघडकीस फसवणूक
महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयकर खात्याच्या प्राथमिक तपासणीत अनेक अनियमितता समोर आल्या आहेत. यात काही पुरुष लाभार्थ्यांची नावे, एका कुटुंबातील एकाहून अधिक अर्जदार, जास्त उत्पन्न असलेले कुटुंब, इतर शासकीय योजना घेणारे लाभार्थी अशा प्रकरणांचा समावेश आहे.
पुढे काय होणार ?
सध्या या सर्व २६ लाख अर्जदारांची प्राथमिक हक्क तपासणी थांबवून प्रत्यक्ष पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पडताळणीनंतर खरोखर पात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा लाभ दिला जाईल. मात्र अपात्र ठरलेल्या अर्जदारांना कोणतेही पैसे मिळणार नाहीत.
सरकारची कारवाई
या गैरप्रकारात अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनीही अनुचित लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक कारवाईचे संकेत दिले असून, चुकीने लाभ घेतलेल्या व्यक्तींवर वसुली व शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
पारदर्शकतेवर भर
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की,
“ही योजना खऱ्या अर्थाने पात्र महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे. चुकीने पैसे घेतलेल्या कोणालाही योजनेचा लाभ दिला जाणार नाही.”
या घडामोडींमुळे जूनपासून थांबलेले पैसे जुलै महिन्यातही पैसे मिळाले नाहीत. मात्र, प्रत्यक्ष पडताळणीत पात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा दरमहा १,५०० रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
तर तुमच्या घरातील सुध्दा लाडक्या बहिणीचा जून व जुलै चा हप्ता थांबला असेल तर ही बातमी त्यांच्या पर्यंत नक्कीच शेअर करा.
