Crop Insurance Update 2025 : आज शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची भरपाई

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलोय , पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत विमा भरपाई रक्कम आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे.

चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

Crop Insurance Update 2025
Crop Insurance Update 2025


खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेले दावे

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई अखेर , सोमवार (11 ऑगस्ट) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. याआधी या रकमा विमा कंपन्यांकडून वेगवेगळ्या वेळेस जमा होत असत, पण यावेळी प्रथमच पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर एकत्रित डीबीटी पद्धतीने वाटप होणार आहे.


किती रक्कम मिळणार ?


या वाटपात खरीप हंगामासाठी 809 कोटी रुपये आणि रब्बी हंगामासाठी 112 कोटी रुपये अशा एकूण 921 कोटी रुपयांचा समावेश आहे. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल.


मुख्य कार्यक्रम झुंझुनू या ठिकाणी 


नुकसानभरपाई वितरणाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. त्यानंतर राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा केली जाईल.


हे वाचा 👉👉 लाडकी बहिण योजनेचा हप्ता रक्षाबंधनाआधी; सरकारकडून बहिणींना खास राखी भेट



भरपाई उशिराने का मिळाली ?


या हंगामात राज्य सरकारचा 1,028 कोटी रुपयांचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे भरपाईची प्रक्रिया थांबली होती. अखेर हा हप्ता 13 जुलै रोजी विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आला आणि नुकसानभरपाईचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी खुले झाले.


कोणाला मिळणार फायदा ?


मागील हंगामात राज्यातील 95.65 लाख शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केला होता. यापैकी 80.40 लाख शेतकऱ्यांना आधीच 3,588 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. आता उर्वरित 15.25 लाख शेतकऱ्यांना 921 कोटींचे वाटप होणार आहे.


शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा


नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना यंदा चांगली भरपाई मिळणार आहे. विमा कंपन्यांनी नुकसानीचे प्रमाण तपासून रक्कम निश्चित केली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील विविध नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ आणि कीड-रोगामुळे झालेले नुकसान यात समाविष्ट आहे.



Post a Comment

Previous Post Next Post