लहान व्यावसायिक आणि फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM Svanidhi Yojana Loan) अंतर्गत आता अर्जदारांना थेट आधार कार्डच्या आधारे ₹५०,००० पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. ही योजना विशेषतः रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले, हातगाडीवाले, लहान विक्रेते आणि असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यासाठी आहे.
![]() |
| PM Svanidhi Scheme 2025 |
प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे ?
PM Svanidhi Yojana ही लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आर्थिक मदत करणारी सरकारी योजना आहे. या योजनेंतर्गत हमीशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
कर्जाची रचना
- पहिला टप्पा: ₹१०,००० पर्यंत प्रारंभिक कर्ज
- दुसरा टप्पा: वेळेत परतफेड केल्यास ₹२०,००० पर्यंत कर्ज
- तिसरा टप्पा: नियमित परतफेडीनंतर थेट ₹५०,००० पर्यंत कर्ज
अर्ज कसा करावा ?
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी (PM Svanidhi Yojana Apply Online) अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत –
- जवळच्या सरकारी किंवा सहकारी बँकेत प्रत्यक्ष अर्ज
- ऑनलाईन अर्ज pmsvanidhi.mohua.gov.in किंवा pmstreetvendor.udaansvamitra.in या पोर्टलवरून
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- बँक खाते तपशील
- व्यवसायाशी संबंधित माहिती
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
- कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष असावे
- लहान व्यवसाय वाढीसाठी टप्प्याटप्प्याने अधिक रक्कम कर्जरूपात मिळते
- आधार कार्डवर कर्ज मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सोपी आहे
प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2025 ही लहान व्यवसायिकांसाठी एक मोठी संधी आहे. या फेरीवाले कर्ज योजनामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लोकांना आधार कार्डवर आधारित कर्ज मिळून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होत आहे. जर तुम्ही लहान व्यवसाय सुरू करण्याचा किंवा वाढवण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
