मराठवाड्यात पावसाचा कहर : शेतकरी हतबल

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलोय , सध्या राज्यात विविध ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होताना दिसत आहे , यामुळे पिकाचे नुकसान होताना दिसत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये कोणती पाऊले उचलली पाहिजे याबाबत अधिक माहिती आज आपण जाणून घेऊया.


Crop Loss Heavy Rain Update 2025
Crop Loss Heavy Rain Update 2025


गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगाम २०२५ मध्ये मान्सूनचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत असून, त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर बसत आहे.


शेतीपिकांचे मोठे नुकसान


सोयाबीन, कापूस, मका यांसह इतर खरीप पिकांवर मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, तर काही ठिकाणी पिके आडवी पडून पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्यांची हतबल अवस्था निर्माण झाली आहे.


हे वाचा 👉👉 ई-पीक पाहणी अॅप सतत डाऊन; शेतकऱ्यांची प्रचंड दमछाक


पंचनामे करून घ्या


अशा परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ आपल्या कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. नुकसानीचा पंचनामा करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण खरीप हंगामातील पिक विमा आणि शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई ही पंचनाम्यावरच अवलंबून आहे.


शासनाकडून मदतीची शक्यता


महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त गावांची नोंदणी केली जाते. गाव बाधित म्हणून घोषित झाल्यास, शेतकऱ्यांना पीक कापणीच्या वेळी विमा भरपाईचा लाभ मिळू शकतो. तसेच शासनाच्या अतिवृष्टी आणि पूर मदत योजनेंतर्गतही आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.


शेतकऱ्यांसाठी इशारा


ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी निष्क्रिय न राहता पंचनामा करण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा. पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळण्यात प्राधान्य दिले जाते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.


Post a Comment

Previous Post Next Post