लाडकी बहिण योजनेचा हप्ता रक्षाबंधनाआधी; सरकारकडून बहिणींना खास राखी भेट

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नव्हता, त्यामुळे लाभार्थींमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महिलांच्या आनंदात भर टाकली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे.


Ladki bahin yojana July installment 2025
Ladki bahin yojana July installment 2025


८ ऑगस्ट रोजी जमा होणार हप्ता

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे ही माहिती देताना सांगितले की, ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांना १५०० रुपयांचा जुलै महिन्याचा सन्मान निधी त्यांच्या खात्यात मिळणार आहे.

दोन हप्ते राहिलेल्या महिलांना मिळणार ३००० रुपये

ज्या महिलांचे जून आणि जुलैचे दोन्ही हप्ते थकित आहेत, त्यांना एकरकमी ३००० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात पाठवली जाईल.

घोटाळ्यांनंतर कठोर छाननी

अलीकडेच या योजनेत मोठ्या प्रमाणात अपात्र नावांचा समावेश झाल्याचे उघड झाल्यानंतर शासनाने कठोर छाननी प्रक्रिया राबवली. त्यामध्ये लाभार्थी नसलेल्या अनेक महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली असून, आता केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे.


हे पण वाचा - PM Kisan 20th Installment : प्रतीक्षेचा शेवट, २ ऑगस्टला मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येणार रक्कम



मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. हे संपूर्ण वितरण पारदर्शक आणि वेळेवर पार पाडण्यासाठी यंत्रणेला कार्यान्वित करण्यात आले आहे.

रक्षाबंधनाची अर्थपूर्ण भेट 

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेली ही आर्थिक मदत ही केवळ रक्कम नाही, तर लाडक्या बहिणींप्रती असलेल्या सन्मानाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. एकप्रकारे ही राज्य सरकारकडून बहिणींना राखीची अर्थपूर्ण भेटच ठरणार आहे.

तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post