नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आज मी घेऊन आलोय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी, उत्तर प्रदेश येथून देशभर वितरित करणार आहेत. तब्बल ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा होणार आहेत. पीएम किसानच्या अधिकृत एक्स हँडलवरून जाहीर करण्यात आले की “आता प्रतीक्षा संपली आहे, २ ऑगस्ट रोजी मोबाईलवर मेसेज टोन ऐकू आला की खात्यात रक्कम पोहोचली असे समजा.” योजनेचा १९वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये वितरित करण्यात आला होता.
![]() |
| Pm kisan 20th Installment |
हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य
कृषी मंत्रालयाने सूचित केले आहे की हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी, आधार सीडिंग आणि जमीन सीडिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे पूर्ण केलेले नाही त्यांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. तपासणी पूर्ण होताच थकबाकीसह रक्कम जमा केली जाईल. ई-केवायसी प्रक्रिया ओटीपी, बायोमेट्रिक पडताळणी किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे पूर्ण करता येते.
हे पण वाचा - कृषी समृद्धी योजना 2025, शेतकऱ्यांसाठी नवीन विमा आणि आर्थिक मदत योजना
लाभार्थी यादी तपासली का?
हप्ता मिळणार आहे का याची खात्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in ला भेट द्यावी. ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करून नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक भरल्यावर आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही आणि ई-केवायसी पूर्ण झाली आहे का हे तपासता येते.
पीएम किसान योजनेचे महत्व
२०१९ मध्ये सुरू झालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजना आहे. पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात, तीन हप्त्यांमध्ये – एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च. रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
पात्रतेचे निकष
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी भारतीय नागरिक असावा, स्वतःकडे शेतीयोग्य जमीन असावी आणि तो संस्थात्मक जमीनधारक नसावा. दरमहा दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे किंवा आयकर भरलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा
