२ ते ६ सप्टेंबर दरम्यान यलो, ऑरेंज आणि ग्रीन अलर्ट
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरूच असताना मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. २ ते ६ सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज आणि ग्रीन अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
२ सप्टेंबर : मराठवाड्यात ऑरेंज, कोकणात ग्रीन
पालघर, ठाणे, मुंबई, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत ग्रीन अलर्ट आहे. रत्नागिरी, कोल्हापूर घाट, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर जिल्ह्यांत यलो अलर्ट लागू आहे.
३ सप्टेंबर : रायगड-रत्नागिरीला ऑरेंज
सातारा, सांगली, कोल्हापूर घाट, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट मिळाला आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, जळगाव, अमरावती आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट लागू आहे.
येथे वाचा 👉👉 Ladaki Bahin Yojana : 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू , ऑगस्ट चा हप्ता मिळणार की नाही ?
४ सप्टेंबर : घाटमाथ्यावर मुसळधार शक्यता
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, ठाणे, नंदुरबार, धुळे आणि नाशिक येथे ऑरेंज अलर्ट आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
५ सप्टेंबर : मुंबई-पुण्याला पावसाचा जोर
मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावती येथे यलो अलर्ट मिळाला आहे. नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, रायगड आणि पुणे घाट या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट मिळाला आहे.
६ सप्टेंबर : नंदुरबारसह कोकणात यलो अलर्ट
नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, पुणे घाट, रायगड, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार घाटमाथा आणि कोकण विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा
