मोफत धान्याचा गैरवापर? रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई सुरू; अन्न विभागाचा मोठा निर्णय

Ration Card Cancelation Update : शासनाच्या मोफत अन्न वितरण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेलं मोफत धान्य वैयक्तिक वापराऐवजी बाजारात विक्रीस काढलं आहे, त्यांचं रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच अशा प्रकरणांमध्ये पुरवठा यंत्रणेतील दोषी दुकानदारांवरही कठोर कारवाई केली जात आहे. (Ration Card Misuse)

Ration Card Cancelation Update
Ration Card Cancelation Update


अकोलामधून कारवाईची सुरुवात ; व्यापाऱ्यांना विक्रीचे पुरावे

अकोला जिल्ह्यात यासंदर्भातील तक्रारी वाढू लागल्यानंतर स्थानिक पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, काही लाभार्थी सरकारकडून मिळालेलं गहू, तांदूळ, साखर आणि डाळी हे थेट स्थानिक व्यापाऱ्यांना विकत असल्याचे निष्पन्न झाले. पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा गैरप्रकारांमध्ये अडकलेल्यांचं रेशन कार्ड तात्काळ रद्द करण्यात येईल, आणि काही प्रकरणांमध्ये ते आधीच रद्द करण्यात आले आहे. (Ration Card Update 2025)


७ कोटी लाभार्थ्यांमध्ये गैरवापर करणाऱ्यांची संख्या वाढतेय

महाराष्ट्रात सध्या अंदाजे ७ कोटी लोकसंख्या रेशन कार्डच्या माध्यमातून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेते. केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम'नुसार गरीब व गरजूंना स्वस्त दरात किंवा मोफत अन्नधान्य पुरवले जाते. परंतु सध्या काहीजण या योजनांचा व्यवस्थित गैरवापर करत असून, ते धान्य गरजूंऐवजी बाजारात विकले जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे खरी गरज असलेल्या नागरिकांपर्यंत अन्न सुरक्षिततेचा लाभ पोहोचत नाही.


दुकानदारांवरही फौजदारी गुन्हे दाखल होणार

संबंधित प्रकरणात केवळ लाभार्थ्यांच्याच नव्हे तर दुकानधारकांचीही चौकशी केली जात आहे. काही दुकानदारांनी काळाबाजाराच्या माध्यमातून सरकारी धान्य खरेदी केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवाय, त्यांचे दुकान परवाने निलंबित अथवा कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, अशी माहिती विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.


पारदर्शक वितरणासाठी कडक निर्णय अनिवार्य

अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केलं आहे की, या कठोर कारवायांचा हेतू केवळ शिक्षा देणं नसून, पारदर्शक आणि नितळ अन्न वितरण व्यवस्था निर्माण करणं हा मुख्य उद्देश आहे. ज्यांच्या घरी खरंच अन्नधान्याची टंचाई आहे, त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचणं ही प्रशासनाची प्राथमिकता आहे.


जनतेला आवाहन – नियम पाळा, लाभ वाचवा

शासनाच्या या नव्या कारवाईनंतर, जनतेला देखील आवाहन करण्यात आलं आहे की, मोफत अन्नधान्याचा वापर केवळ वैयक्तिक गरजांसाठीच करा. जर धान्य विक्री, खोटे लाभार्थी किंवा अपात्र व्यक्ती कार्ड वापरत असल्याचं आढळलं, तर त्यांचं कार्ड रद्द होईलच, शिवाय भविष्यात कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यापासूनही त्या व्यक्तीला वंचित राहावं लागू शकतं. (Government Cancels Ration Cards)


तुमचं रेशन कार्ड सुरक्षित आहे का ? त्वरित तपासा !

राज्यभरात चाललेल्या तपास मोहिमेमुळे अनेक कार्डधारकांची घबराट उडाली आहे. ज्यांचं रेशन कार्ड बंद झालं असेल किंवा थांबलेले लाभ आहेत, त्यांनी आपल्या तहसील कार्यालयाशी, रेशन दुकानाशी किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा. तसेच, अधिकृत पोर्टलवरून आपल्या रेशन कार्डची स्थिती तपासता येते.


Post a Comment

Previous Post Next Post