लाडकी बहिण योजना जून हप्ता सुरू; पात्र महिलांना ₹1500 जमा

Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारच्या माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता ३० जूनपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेत प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला दरमहा १,५०० रुपये मिळतात. 


Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Update


या महिन्याचा हप्ता म्हणजेच बारावी किस्त आजपासून थेट बँक खात्यात जमा होत आहे. काही महिलांना ही रक्कम ३० जून रोजी मिळेल, तर काहींच्या खात्यात ती १ जुलै रोजी जमा होईल.

हप्त्यासाठी ३,६०० कोटींचा निधी उपलब्ध

राज्य शासनाने या महिन्यातील हप्त्यासाठी एकूण ३,६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेसाठी सरकारने स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद केली असून, लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा केले जात आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हा मोठा पाऊल मानले जात आहे.

अपात्र ठरलेल्या महिलांना पुढील हप्त्यांपासून झटका

योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना हप्ता मिळेलच असे नाही. शासनाने आता लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा तपासण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास येईल, अशा महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे काही महिलांना हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

दोन हप्त्यांचा एकत्र भरणा होण्याची शक्यता

यापूर्वी काही महिलांच्या खात्यात मागील महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना या महिन्यात दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच ३,००० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या बाबत अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पात्रतेच्या अटींकडे पुन्हा एकदा लक्ष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे. त्या महाराष्ट्राच्या स्थायी रहिवासी असाव्यात आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक नसावे. बँक खात्यात आधार क्रमांक लिंक असणेही अनिवार्य आहे. काही महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकरणांची पुन्हा पडताळणी सुरू आहे.

पैसे न मिळाल्यास संपर्क साधावा

ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही, त्यांनी संबंधित स्थानिक प्रशासन,अथवा ग्रामपंचायत कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे पैसे उशिरा जमा होण्याची शक्यता असून, याबाबत लाभार्थ्यांनी संयम ठेवावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

पुढील हप्ता जुलै अखेरीस अपेक्षित

जुलै महिन्याचा हप्ता येत्या ३० किंवा ३१ तारखेला खात्यात जमा होण्याची शक्यता असून, यासाठी शासनाने आधीच तयारी सुरू केली आहे. पात्र महिलांनी आपले बँक खाते आणि आधार कार्ड अपडेट ठेवणे आवश्यक आहे.



Post a Comment

Previous Post Next Post